गौरीघूमट येथे चोरी करणाऱ्या चोरास पकडले: साडेचार लाखाचे दागिने जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । नगर

गौरीघुमट येथील व्यंकटेश बुरा यांच्या घरी घरफोडी चोरी करून सुमारे दोन लाख चौपन्न हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या रवींद्र शंकर ताटीकोंडा याला कोतवाली पोलिसांनी शिताफीने पकडले. त्याच्या कडून 18 तोळे सोन्या चांदीचे असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राहुरी येथे सोमवारी पोलिसांनी केली.

बुरा यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे हे करीत होते. तपासादरम्यान. या चोरीतील संशयीत आरोपी राहुरी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी रवींद्र ताटीकोंडा यास अटक केली. त्याच्याकडून चोरीचे 18 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. अटक आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला बुधवार दि. 2 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पो. नि नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनावरून पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे, हे. कॉ. पालवे, पो. ना. शाहीद शेख, पो ना गाडगे, पो. ना.गवारे, पो.ना. दुधाळ, पो कॉ. इंगळे. प्रमोद लहरे, शेख,मोहिते यांनी ही कारवाई केली.