दिवसा काम आणि रात्री चोऱया 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 गोरेगावच्या चित्रनगरी येथे दिवसा डेकोरेशनचे काम आणि रात्रीच्या वेळेस मोटारसायकल चोरणाऱयाला अखेर आरे पोलिसांनी अटक केली. मनीष मिश्रा असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चार मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. मिश्रा हा सराईत चोरटा असून त्याच्याविरोधात गोरेगाव, वनराई आणि आरे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

मिश्रा चित्रनगरीत डेकोरेशनचे काम करतो. दारूच्या आहारी गेल्याने तो चोऱया करू लागला. आरे कॉलनी परिसरातून तीन मोटारसायकली चोरी झाल्या होत्या. त्याप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. वरिष्ठ निरीक्षक शेखर ठोंबे याच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक दयानंद पवार आणि पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी मिश्राला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. चोरीच्या गुह्यात मिश्राला अटक करून न्यायालयात हजर केले होते.