याला निष्ठा म्हणतात…! नागपुरातील नव्या पक्ष कार्यालयाच्या पाहणीनंतर उद्धव ठाकरेंचे उद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरच्या विधिमंडळ परिसरातील नव्या पक्ष कार्यालयाची पाहणी केली. त्यावेळी उपस्थित आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो… अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून नमन केलं.

यानंतर कार्यालयात उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी आमदार, कार्यकर्ते यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना ‘बऱ्याच दिवसांनंतर मी या सगळ्यांना भेटलो. तरी या सगळ्यात ते कुठेही हलले नाहीत. त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. याला निष्ठा म्हणतात. या सगळ्यांमुळेच शिवसेना टिकून आहे आणि आणखी मजबुतीने पुढे जाईल’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.