
चोरीच्या गुन्ह्यात तिघांना वाकोला पोलिसांनी अटक केली. रोहित राठोड, आरिफ रकिब खान आणि हैदर अली ऊर्फ चिंटू सजाऊद्दीन काचवाला अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने आणि मोटरसायकल जप्त केली आहे. चोरीप्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सुनयना नटे यांच्या पथकातील उपनिरीक्षक नितीन सवणे यांच्या पथकातील सौंदनकर, पाटील, पोटे, बारावकर, मिस्त्री आदींनी तपास करत ताब्यात घेतले.



























































