एसटी बसच्या चालकास मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

मुरुड ते लातूर मार्गावरील साखरा पाटीजवळ मोटारसायकलवरील तिघांनी संगनमत करून एस.टी. बसच्या चालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी गातेगाव पोलीस ठाण्यात नितीन बबन शेवाळे एस.टी. बसचा चालक याने तक्रार दाखल केली. पंढरपूर ते निजामाबाद ही एस.टी.बस घेऊन जात असताना साखरा पाटीजवळ मोटारसायकल बससमोर लावून बस थांबवण्यात आली. बसच्या चालकास खाली उतरवून शिवीगाळ केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून मोटारसायकलवरील तिघा अज्ञातांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.