कामातील हलगर्जीपणा भोवला; महावितरणच्या तीन अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आपल्या कामात हलगर्जीपणा करणे महावितरणच्या तीन अभियंत्यांना चांगलेच महागात पडले आहे. धुळे आणि जळगाव जिह्यात केलेल्या तपासणीत नवीन वीज जोडणी दिलेल्या ग्राहकांची संख्या, थकबाकी असल्याने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची संख्येत मोठय़ा प्रमाणात तफावत अढळून आल्याने जळगाव शहर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीण बिसेन, धुळे शहर उपविभागाचे कार्यकारी अभियंता रामचंद्र सारडा, जळगाव एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता देवेंद्र भंगाळे आणि प्रधान तंत्रज्ञ राकेश वंजारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम-पाटील यांनी नुकताच जळगाव आणि धुळे जिह्याचा दौरा केला होता. यावेळी केलेल्या तपासणीत नवीन वीज कनेक्शन दिलेल्या ग्राहकांची संख्या, कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या संख्येत तावत आढळली आहे.