छत्रपती संभाजीनगरात तीन तरुणांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणासाठी दिलेला अल्टिमेटम संपूनही मिंधे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गंभीर नाहीत. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. एकटय़ा छत्रपती संभाजीनगरात दोन मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या. यातील एकाने तर सुसाईड नोटमध्ये आरक्षण मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करू नका असे लिहिले असून आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे.

पहिल्या घटनेत हिंगोली जिह्यातील आखाडा बाळापूर गावातील 25 वर्षांच्या कृष्णा कल्याणकर या तरुणाने आज गुरुवारी सकाळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत अंतरवाली डेंबी येथील शिवाजी माने (45) याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. तर आणखी एका घटनेत आपतगाव येथील गणेश कुबेर (28) या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली.

कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळावे

राष्ट्रवादी काँग्रेसची संघर्ष यात्रा आज सणसवाडीतून पुढे गेली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज गुरुवारी यात्रेदरम्यान मराठा आंदोलक, शेतकरी आणि विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या अडचणी समजून घेतल्या. त्याचबरोबर  मराठा समाजाला आणि आरक्षणासाठी जालन्यातील आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी गुरुवारी दिवसभर अन्नत्याग केला. तसेच कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण असावे यासाठी सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे, अशी भूमिकाही रोहित पवार यांनी संघर्ष यात्रेदरम्यान मांडली.