धर्माचा अपमान आणि धर्म परिवर्तनासाठी पैशांचा लालूच दाखवल्याप्रकरणी ठाण्यात तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धर्माचा अपमान केल्याप्रकरणी आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी पैशांचे आमीष दाखवल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तिघेही भिवंडीचे रहिवासी आहेत.भिवंडीतील अंजूर फाटा भागात निरंजन हेगडे आपल्या रहिवासी इमारतीच्या खाली आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होते. तेव्हा गजेंद्र देवनूर, अजय गौतम आणि अमर वडवण हे तीन तरुण त्यांच्याकडे आले. देवनूरने हेगडे यांना पैसे कमवायचे आहेत का? असा प्रश्न विचारला. तसेच ख्रिश्च धर्म स्विकारल्यास तुम्हाल पैसे मिळतील असे सांगितले. हे तिघे इतक्यावरच थांबले नाहीत, त्यांनी हिंदू धर्माचीबदनामी करायला सुरुवात केली , यामुळे हेगडे आणि त्यांचे मित्र चांगलेच चिडले आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

धर्माचा अपमान केल्याप्रकरणी देवनूर आणि त्याच्या साथीदारविरोधात कलम 295 A आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. या प्रकरणाबाबत सर्व दृष्टिकोनातून तपास केला जाईल असे पोलिसांनी सांगितले.