बडोदे शहरात तीन मजली इमारत कोसळली, 3 मजूर ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
baroda-building-collapse

गुजरातमधील बडोदे शहरात बावा मान पूरा भागात एक इमारात कोसळली आहे. या घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाचे बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.

घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ही तीन मजली इमारत आधीपासूनच एका बाजूला झुकली होती. लोकांनी प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार देखील केली होती. या भागात इमारत कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक वाहनं दाबली गेली आहेत.