बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा शहरात समाज कल्याण वसतिगृहाचे बांधकामासाठी तात्पुरत्या स्वरुपात पाणी मिळावे म्हणून खड्डा तयार करण्यात आला. दुर्दैवाने त्यात पोहायला गेलेल्या तीन स्थानिक शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ८.३० दरम्यान घडली. चितेश मोगरकर (१०) , आदर्श राठोड (११), संचेतन राठोड (११) अशी या तीन मुलांची नावं आहेत.

मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेतील तिसऱ्या विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात आलं असून स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात त्याचाही मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या दोन मुलांच्या सायकली या खड्ड्याशेजारीच आहेत. मात्र, या खड्ड्यात अजून एक मुलगा बुडल्याचे पालक सांगत आहेत. त्यामुळे आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून या मुलाचा शोध घेणं सुरू आहे.

summary- three students died due to drowning in yavatmal