‘थम्स अप’चा पॅरालिम्पिक खेळाडूंच्या धैर्याला सलाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो ऑलिम्पिकला पाठिंबा दिल्यानंतर आता ‘थम्स अप’कडून टोकियो पॅरालिम्पिकसाठीही पुढाकार घेण्यात आला आहे. टोकियो पॅरालिम्पिकला सहकार्य करणारा ‘थम्स अप’ हा पहिला एफएमसीजी ब्रॅण्ड ठरला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या खेळाडूंच्या धैर्याला सलाम करण्याचा प्रयत्न यावेळी ‘थम्स अप’कडून करण्यात येणार आहे.

या सहयोगाबाबत बोलताना ‘पद्मश्री’, ‘खेलरत्न’, ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त, पॅरालिम्पिक गेम्समध्ये पदक जिंकणाऱया पहिल्या हिंदुस्थानी महिला आणि पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष डॉ. दीपा मलिक म्हणाल्या, ‘‘विकलांगत्वाच्या पलीकडे असलेल्या क्षमतेच्या माझ्या प्रवासाने विकलांगत्वाबाबतची समज मोडून काढली आहे. ‘थम्स अप’सोबतचा सहयोग त्या दिशेने एक पाऊल पुढे आहे. या वर्षी हिंदुस्थान टोकियो 2020 पॅरालिम्पिक गेम्ससाठी आतापर्यंतच्या सर्वोत्तम खेळाडूंची सर्वात मोठी तुकडी पाठवत आहे आणि 54 खेळाडूंची विषमता व सामाजिक निषिद्धांवर मात करत पुढे जाण्याची स्थिर कथा आहे. मला आशा आहे की, आपण यावेळी इतिहास रचणार आहोत. ‘थम्स अप’सारखे ब्रॅण्ड आमच्या पॅरालिम्पियन्सना त्यांच्या कथा सांगण्यास व्यासपीठ देण्यासाठी आणि त्यांचा उत्साह उंचावण्याची संधी देण्यासाठी पुढे येत आहेत.