पाहा व्हिडीओ: भद्रावती शहरात पट्टेदार वाघोबाचे दर्शन

सामना ऑनलाईन । चंद्रपुर

चंद्रपूरच्या जिल्ह्यातील भद्रावती शहरात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. भद्रावतीमधील मुख्य बसस्थानकाच्या मागील बाजूला असलेल्या झुडुपात वाघाचे वास्तव्य आढळून आले आहे. शहरातील याच भागात केंद्रीय दारुगोळा फॅक्टरी असून मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ वाघाचे दर्शन झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. वाघाला बघण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली आहे.

दरम्यान, वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. नागरी भागात परिसरात पट्टेदार वाघाच्या वास्तव्यामुळे कोणतीही अनुचीत घटना घडू नये, म्हणून उपाययोजना करण्यात येत असून, वाघाला पुन्हा जंगलात परतवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.