बँक मॅनेजरला लावला चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सायबर ठगाने बँक मॅनेजरला चुना लावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार हे बँक मॅनेजर आहेत. एप्रिल महिन्यात त्याने एका वेबसाईडवर एक जाहिरात पाहिली होती. काही बॉलिवूडच्या अभिनेत्यांनी वेबसाईडचे प्रमोशनल विडिओ अपलोड केले होते. त्यावर विश्वास ठेऊन तक्रारदार याने त्या वेबसाईडवर अकाउंट उघडले. त्यानंतर त्याना एका नंबर वरून पह्न आला आणि पैसे गुंतवून गेम खेळण्यास सांगितले. काही वेळाने त्याना पुन्हा एकाचा पह्न आला. पैसे तीन वेळा रोलओव्हर केल्यावर पूर्ण पैसे काढू शकतात असे सांगितले. विश्वास बसल्यावर त्याने सुरुवातीला 30 हजार रुपये गुंतवले. पैसे गुंतवल्यावर त्याना काही वेळाने 1200 रुपये बोनस त्याच्या खात्यात जमा झाला. पंधरा दिवसापूर्वी त्याने वेबसाईडवर त्याची जमा झालेली रक्कम पाहिली. दुसऱया दिवशी त्याने खाते तपासले असता त्याच्या खात्यातून पैसे कमी झाल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने एका नंबरवर पह्न केला. तेव्हा तुमची ऑर्डर चुकीची आहे असे त्याना सांगण्यात आले. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्याने टिळक नगर पोलिस ठाण्यात धाव घेतली.