
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या शास्त्राrय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱया विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जातात. त्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यासाठी शिक्षण मंडळाने येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.
शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल उशिरा लागल्याने शास्त्राrय कला, चित्रकला व लोककलेचे प्रस्ताव सादर करण्यास 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीनंतर काही तांत्रिक अडचणींमुळे दिलेल्या मुदतीत माध्यमिक शाळांना अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव सादर करता आले नाहीत. त्यामुळे 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.



























































