शंभर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘टाइम’ बदलला

‘टाइम’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने आपल्या शंभर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावरील आपला लोगो छोटा केला आहे. या लोगोवरूनच ‘टाइम’ची खरी ओळख होती. परंतु ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावर ‘टाइम’ या शब्दाच्या जागी ‘वोट’ हे शब्द दिसत आहेत.

येत्या 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांसाठी निवडणूक होणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच यावेळी निवडणुकीचा जोरदार प्रचार दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘टाइम’ नियतकालिकाने अमेरिकेच्या आवृत्तीमध्ये ‘वोट’ हे शब्द मुखपृष्ठावर घेतले आहेत. या अंकात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील प्रचाराबद्दल विशेष लेख आहे. यंदाचे वर्ष हे कोरोनामुळे खूपच दुŠखदायक आणि नुकसानदायक ठरले. अनेक देश अजूनही या साथीमधून सावरण्याचा, परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्हीही थोडा बदल करायचे ठरवले असे ‘टाइम’चे सीईओ एडवर्ड फेलसेन्थल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या