गुडघेदुखीवर उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. राकेश नायर, गुडघे प्रत्यारोपण सर्जन

हिवाळ्यातील गुडघ्याच्या सांध्यांतील वेदनांना प्रतिबंध करण्याची एक अशी पद्धत नाही. दिनक्रमात काही मूलभूत बदल केल्यास तुम्ही हा ऋतू आरामात घालवू शकता.  

  • गुडघेदुखी दुखापतीमुळे निर्माण होत असली किंवा संधीवातासारख्या विकाराचे ते लक्षण असले, तरी हिवाळ्यात निरोगी व्यक्तीलाही सांध्यांमध्ये (विशेषतः गुडघ्याच्या सांध्यात) वेदना जाणवू शकतात. या वेदनेचे आणि ताठरपणाचे नेमके कारण कळत नाही.
  • यावर उपाय म्हणजे शरीराचे स्नायू व सांध्यांना पुरेसा रक्तपुरवठा होण्यासाठी क्रियाशील राहणे महत्त्वाचे आहे. त्रास होत असेल तर फार तीव्र स्करूपाचे उपक्रम करू नका, पण पूर्णपणे निक्रिय अजिबात होऊ नका. संधीवाताच्या रुग्णांनी त्यांचे फिजिओथेरपीस्ट किंवा ऑर्थेपेडिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • व्यायामप्रकार सुरू करण्यासाठी पुरेसे वॉर्म-अप करणे आणि स्ट्रेचिंग महत्त्वाचे आहे. तत्काळ वेदनामुक्तीसाठी हीट पॅक्स वापरू शकाल. पण तो भाग भाजणार नाही याची काळजी घ्या.