
सामना ऑनलाईन । बंगळुरू
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या कन्नड आणि सांस्कृतिक विभागाला टिपू सुलतान यांची जयंती साजरी न करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटकमध्ये दरवर्षी 10 नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली जाते. टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याची कर्नाटकच्या जनतेची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे सरकारने तातडीने ही जयंती साजरी न करण्याचे निर्देश द्यावेत. जयंती साजरी करण्यामागे केवळ मुस्लिम समाजाला खूश करण्याची सरकारची भूमिका आहे, असे ट्विट येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री बनण्यापूर्वी केले होते. भाजपचा विरोध असूनही कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. टिपू सुलतान हे हिंदुस्थानचे पहिले स्वातंत्र्यसैनिक होते. त्यामुळे त्यांची जयंती साजरी करायलाच हवी अशी त्यांची भूमिका होती.





























































