
अक्षय कुमार अभिनित राम सेतू या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रामसेतू – सत्य की कल्पना? अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. पोस्टरवर संशोधकाच्या वेशभूषेतील अक्षय कुमार दिसत आहे. हा चित्रपट हिंदुस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमधील सामुद्रधुनीमध्ये दिसणाऱ्या पुलावर आणि त्याच्या शोधावर बेतली आहे.
या चित्रपटात अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘राम सेतु’चा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय एका पुराण वस्तूसंशोधकाच्या भूमिकेत दिसत आहे. या ट्रेलरमध्ये दमदार अॅक्शन सीन्ससोबत रामसेतूचा थरारक शोध पाहायला मिळत आहे. तसेच चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा बिग बजेट चित्रपट असल्याचं दिसून येतं.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केलं आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचाही चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
पाहा ट्रेलर-

























































