युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

सामना प्रतिनिधी । तुमसर (भंडारा)

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खापा ग्रामपंचायत येथे झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सबज्युनीयर स्पर्धेत उंच उडी स्पर्धेत रुपाली सुरेश काळे हिने 3.86 मीटर लांब उडी मारून तृतीय क्रमांक पटकाविला. त्याबद्दल शिवसेना तुमसर तालुक्याच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. तसेच सरस्वती हायस्कूल खापा येथून लोकेश कोल्हारकर हा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना शालेय वस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, उपतालुका प्रमुख नितेश वाडीभस्मे, तरूण बेरोजगार कृती समितीचे अमित एच. मेश्राम, शहर प्रमुख नितीन सेलोकर, विभाग प्रमुख संजय झंझाड, ईश्वर भोयर, सचिन मोहतुरे, रामेश्वर ठवकर, कैलास नागदेवे, शाखा प्रमुख महेंद्र मेश्राम, विलास कनोजे, प्रकाश आगाशे, पंकज तलवारे, कैलास तितीरमारे, शेष गणवीर, महेंद्र चाचिरे सह ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक उपस्थित होते.