
सामना ऑनलाईन । हैदराबाद
तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीने पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत आपल्याच विधानपरिषदेच्या तीन आमदारांचे निलंबन केले आहे. यादव रेड्डी, भूपती रेड्डी आणि रमेश नायक असे निलंबीत आमदारांची नावे असून हा निर्णय तत्काळ लागू होईल.
Hyderabad: Three Telangana Rashtra Samithi (TRS) MLCs – Yadava Reddy, Bhupathi Reddy and Ramesh Nayak – have been disqualified from Telangana Legislative council on grounds of defection. pic.twitter.com/mCYZrmzcit
— ANI (@ANI) January 16, 2019
या तीन आमदारांनी नुकतच्या झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षासाठी काम केले होते आणि पक्षाची जबाबदारी झुगारली होती. त्यामुसार टीआरसने या तिघांविरोधात तक्रा केली होती. या तक्रारीनंतर या आमदारांवर कारवाई करत त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे.
रमेम्श नाईक यांची निवड राज्यपालाचा कोट्यातून झाली होती, यादव रेड्डी यांची निवड आमदारांच्या कोट्यातून झाली होती. तर भूपती रेड्डी यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यातून झाली होती.




























































