४० वर्षांनंतर… ट्युशियाने जिंकली वर्ल्ड कपची लढत

18

सामना ऑनलाईन,सारांस्क

ट्युनिशियाने गुरुवारी मध्यरात्री पनामाला २-१ अशा फरकाने हरवले आणि तब्बल ४० वर्षांनंतर फुटबॉल वर्ल्डकपमधील सामना जिंकला. ‘जी’ गटातून या दोन्ही संघांचे आव्हान याआधीच संपुष्टात आले होते तरी ही लढत दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची होती. यामध्ये बेन युसेफने ५१व्या आणि वाहिबी खाजरीने ६६व्या मिनिटाला गोल करीत ट्युनिशियाला मौल्यवान विजय मिळवून दिला. पनामाला मात्र विजयाविनाच मायदेशी परतावे लागले.
टय़ुनिशियाने १९७८ साली फुटबॉल वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला होता. त्यावेळी ट्युनिशियाने मेक्सिकोला हरवले होते. त्यानंतर त्यांना थेट २०१८ साली विजय संपादन करता आला. तसेच वर्ल्ड कपमधील लढतीत विजय मिळवणारा ट्युनिशिया हा संघ आफ्रिका खंडातील पहिलाच देश ठरला होता.

अंतिम १६ फेरीच्या लढती खालीलप्रमाणे

३० जून : फ्रान्स वि. अर्जेंटिना
३० जून : उरुग्वे वि. पोर्तुगाल
१ जुलै : स्पेन वि. रशिया
१ जुलै : क्रोएशिया वि. डेन्मार्क

२ जुलै : ब्राझील वि. मेक्सिको
२ जुलै : बेल्जियम वि. जपान
३ जुलै : स्वीडन वि. स्वित्झर्लंड
३ जुलै : कोलंबिया वि. इंग्लंड

आजच्या लढती
अर्जेंटिना वि. फ्रान्स, कझान
सायंकाळी ७.३० वाजता

पोर्तुगाल वि. उरुग्वे, सोची
रात्री ११.३० वाजता

आपली प्रतिक्रिया द्या