आषाढी एकादशी यात्रेनिमित्त दक्षिण मध्य रेल्वेच्या १२ विशेष गाड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नांदेड

२३ जुलै २०१८ रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त दक्षिण मध्य रेल्वेने १२ विशेष गाड्या चालवण्याचे ठरविले आहे. यापैकी नांदेड विभागातून ८ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद या गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. यात आदिलाबाद-पंढरपूर विशेष गाडी आदिलाबाद येथून दिनांक २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सुटेल, किनवटला १०.१४ वाजता, नांदेड दुपारी १३.०५ वाजता, परभणी १४.२७ वाजता, परळी १६.१० वाजता, लातूर १९.१० वाजता निघून पंढरपूर येथे रात्री २३.३० वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात पंढरपूर ते आदिलाबाद ही विशेष गाडी २४ जुलै पंढरपूर येथून सकाळी ५.३० वाजता सुटेल. लातूर, परळी-१३.३०, परभणी-१५.०५ नांदेडला १६.१० वाजता पोहोचेल आणि भोकर-१७.२२ , किनवट-१९.२२ मार्गे आदिलाबाद येथे रात्री २०.४० वाजता पोहोचेल. या गाडीला १० डब्बे असतील.

नगरसोल-पंढरपूर-नगरसोल ही गाडी नगरसोल येथून दिनांक २२ जुलै रोजी सायंकाळी १७.३० वाजता सुटेल, रोटेगाव, परसोडा, लासूर मार्गे संभाजीनगर येथे १८.५० वाजता पोहोचून १९.०५ वाजता सुटेल. जालना येथे २०.२० वाजता, परतूर, सेलू, मानवत रोड मार्गे परभणी येथून दिनांक २३ जुलै रोजी ००.५० वाजता सुटेल, पुढे गंगाखेड-०१.४५, परळी-२.४५ वाजता सुटून लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी मार्गे ही गाडी पंढरपूर येथे २३ जुलै रोजी सकाळी १०.०५ वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात पंढरपूर-नगरसोल ही विशेष गाडी पंढरपूर तेथून २४ जुलै रोजी रात्री २३.५० वाजता सुटेल आणि २५ जुलै रोजी परळी-७.०० , परभणी-८.३०, जालना-१०.५४, संभाजीनगर येथे सकाळी ११.४० वाजता पोहोचेल आणि ११.४५ वाजता सुटून नगरसोल येथे २५ जुलै रोजी दुपारी १३.३० वाजता पोहोचेल. या गाडीला १० डब्बे असतील.

अकोला-पंढरपूर-अकोला ही गाडी अकोला येथून २२ जुलै रोजी रात्री २०.१० वाजता सुटेल, वाशीम-२१.२५, हींगोली-२२.०६, पूर्णा-२३.५५ परभणी येथे २३ जुलै रोजी ००.३० वाजता पोहोचेल. ही गाडी परभणी येथे नगरसोल-संभाजीनगर येथून येणाऱ्या गाडीला जोडण्यात येईल. पुढे ही गाडी पंढरपूर येथे सकाळी १०.०५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी परभणी येथून अकोलाकडे जाणारे डब्बे वेगळे करून रात्री ८.१७ वाजता सुटेल आणि अकोला येथे दुपारी १३.१५ वाजता पोहोचेल. या गाडीला १० डब्बे असतील.

बिदर-पंढरपूर-बिदर ही विशेष गाडी २२ जुलै रोजी दुपारी बिदर येथून १५.४५ वाजता सुटेल आणि भालकी, कमलानगर, उदगीर, लातूर रोड ला १८.०० पोहोचेल. पुढे ही गाडी आदिलाबाद-पंढरपूर विशेष गाडीला लातूर रोड येथे जोडण्यात येईल आणि पुढे ही गाडी आदिलाबाद-पंढरपूर विशेष गाडी बनूनच धावेल. ही गाडी पंढरपूर येथे रात्री २३.३० वाजता पोहोचेल.

तसेच या गाडीचे डब्बे पंढरपूर-आदिलाबाद विशेष गाडीला जोडून लातूर रोडपर्यंत येतील आणि लातूर रोड येथे ते वेगळे करून पुढे ही गाडी लातूर रोड येथून विशेष गाडी बनून २५ तारखेला सकाळी १०.१७ वाजता लातूर रोड येथून सुटेल आणि उदगीर, कमलानगर, भालकी मार्गे बिदर येथे दुपारी १३.२० वाजता पोहोचेल. या गाडीला १० डब्बे असतील.

पंढरपूर-बिदर-पंढरपूर ही विशेष गाडी २३ जुलै रोजी सकाळी ०५.३० वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि कुर्डूवाडी, बार्शी, धाराशिव, लातूर, लातूर रोड, उदगीर, कमलानगर, भालकी मार्गे बिदर येथे दुपारी १३.२० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात २३ जुलै रोजी बिदर येथून सायंकाळी १६.०० वाजता सुटून भालकी, कमलनगर, उदगीर, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी, कुर्डूवाडी मार्गे पंढरपूर येथे रात्री २३.३० वाजता पोहोचेल. या गाडीला २० डब्बे असतील.

पंढरपूर-बिदर-पंढरपूर ही विशेष गाडी २३ जुलै रोजी दुपारी १२.०० वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि कुर्डूवाडी, बार्शी , धाराशिव, लातूर, लातूर रोड, उदगीर, कमलानगर, भालकी मार्गे बिदर येथे सायंकाळी १९.१५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात २४ जुलै रोजी ही गाडी बिदर येथून दुपारी १४.३० वाजता सुटून भालकी, कमलनगर, उदगीर, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी, कुर्डूवाडी मार्गे पंढरपूर येथे रात्री २२.१० वाजता पोहोचेल. या गाडीला २० डब्बे असतील.