
रुग्णवाहिकेतून सायरन वाजवत गरबा खेळायला जाणाऱया वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार नुकताच समोर आल्यानंतर आता जिह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघात राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची चक्क शववाहिकेतून वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी अनिल भालेराव, सनी ठमके (रा.वडणगे) या दोघांना कागल पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून शववाहिकेसह चार लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विजयादशमी दिवशी कसबा सांगाव ते कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत मार्गावर संशयास्पद शववाहिका जाताना कागल पोलिसांनी पकडली होती. याप्रकरणी अनिल भालेराव आणि सनी ठमके या दोघांना कागल पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, संशयितांनी आज गुह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून 4 लाख 78 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी साखळी आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.





























































