आजरा फाटा येथे 7 लाख 40 हजारांच्या दारुसह दोघे ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महामार्ग पोलिसांनी धडक कारवाई करीत सावंतवाडी येथील आजरा फाटा येथे 1 लाख 40 हजार रुपयांची अवैध दारू तसेच 6 लाख रूपयांची चारचाकी गाडी असा एकूण 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास आजरा फाटा येथे महामार्ग पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. दोषी वाहनचालकांवरती मोटर अधिनियमानुसार कारवाई करीत असताना चारचाकी गाडी क्रमांक (एम. एच. 04 एच. एन 2669) घेऊन चालक केतन केशव तांडेल ( रा. सावरकर नगर ,ठाणे ) तिथे आला. त्यावेळी त्याच्या सोबत सुमित सुनील नलावडे (रा. सावरकर नगर, ठाणे ) हा होता.
पोलिसांनी त्यांच्या गाडीची तपासणी केली तर 1, 40 हजार रुपये किमतीची अवैध दारू आढळून आली. त्या गाडीसह जप्त करण्यात आली. तसेच त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव, हवालदार वेंगुर्लेकर , पोलिस नाईक पाटील ,पोलीस शिपाई चिंदरकर , कांबळे आदी सहभागी झाले होते.