
सामना ऑनलाईन । रायपूर
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत बीएसएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर एक जवान जखमी झाला आहे. बीएसएफ जवान नक्षलवाद्यांच्या शोधार्थ बाहेर पडलेले असताना ही चकमक झाली.
#Visuals from Chhattisgarh: 2 BSF jawans lost their lives, 1 injured after naxals opened fire on a BSF platoon in Partapur police station limits in Kanker around 3.45 am today. The mortal remains of the jawans have been brought to 114 BSF Batallion HQ in Pakhanjor. pic.twitter.com/NaA4yhCAMC
— ANI (@ANI) July 15, 2018
रविवारी पहाटे पावणे चारच्या दरम्यान गस्तीवर निघालेल्या बीएसएफ जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला. मात्र, या चकमकीत दोन जवान धारातीर्थी पडले. हेड कॉन्स्टेबल मुख्तियार सिंग आणि कॉन्स्टेबल लोकेंद्र अशी शहीद झालेल्या जवानांची नावं आहेत. शहीद जवानांचे पार्थिव पंखाजूर येतील बीएसएफच्या मुख्यालयात आणण्यात आल्याची माहिती प्राप्त आहे.

























































