
सामना प्रतिनिधी । मुंबई
जुहू चौपाटीवर गुरुवारी सायंकाळी पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी दोघांचे मृतदेह सापडले. तर एकाचा शोध आजही सुरू होता. सोहेल आणि फरदीन शेख अशी आज सापडलेल्या मुलांची नावे आहेत.
जुहू चौपाटी येथील गोदरेज बंगल्याजवळच्या समुद्रात पोहण्यासाठी गुरुवारी पाच युवक गेले होते. भरतीच्या वेळी पोहायला गेलेले हे पाच जण अचानक लाटेसोबत वाहून जाऊ लागले. त्यावेळी चौपाटीवर असलेल्या लाइफ गार्डस्ने या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. वसीम खान या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर अन्य चौघांचा शोध सुरू होता. गुरुवारी रात्री उशिरा नजीर काझीचा मृतदेह सापडला तर आज सकाळी फरदीन सौदागर, सोहेल शकील खान यांचे मृतदेह सापडले. फैजलचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. हे पाचही जण डी. एन. नगर येथील टेकडीवर राहणारे होते.


























































