
सामना प्रतिनिधी । पणजी
बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी युगांडा येथील किकाबी डोरीन आणि चार्लस चिडीबीरे या नाइजेरियन नागरीकाला अटक केली.
पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहीती नुसार, कळंगुट पोलीस सायंकाळी 6 वाजता गस्त घालत असताना 2 विदेशी नागरीक संशयास्पद फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसाची चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतीच अधिकृत कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यानंतर दोघांविरोधात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.

























































