तिरुपतीहून कडप्पाकडे जाणारी बस लॉरीला धडकली; अपघातात 2 जण ठार, 16 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
odisha accident

तिरुपतीहून कडप्पाकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस विरुद्ध दिशेने येणाऱ्या लॉरीवर धडकली. या अपघातात लहान बालकासह एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर 16 जण जखमी झाले. कडप्पा जिल्ह्यातील पुल्लामपेटा येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास उडुमुवारीपल्ली गावाजवळ हा अपघात घडला.

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अल्ट्रा डीलक्स बस तिरुपतीहून कडप्पाकडे चालली होती. या बसमध्ये 27 प्रवासी होते. उडुमुवारीपल्ली गावाजवळ ही बस विरुद्ध दिशेने येणाऱ्या लॉरीला धडकली. या दोघांचा मृत्यू झाला तर 16 जण जखमी झाले. लॉरीचा चालकही अपघातात जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी राजमपेट सरकारी रुग्णालय आणि इतर वैद्यकीय केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले आहे.