
सामना प्रतिनिधी । नागपूर
मॉर्निंग वॉकला गेलेल्या महामा गांधी शाळेच्या दोन लिपीकांना बोलेरो कार चालकाने भरधाव कार चालवून चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी सावनेर येथे घडली. या अपघातातील अन्य एक गंभीर आहे.
सकाळी हेंमत लाडे, नागोराव बिनसिंगे, उमेश चौधरी हे तिघे महामा गांधी शाळेतील लिपीक छिदवाडा रोडवर मॉनिंग वॉकला गेले असता जनता लॉन जवळ भरधाव बोलेरो कारने धडक दिली. या अपघातात हेंमत लाडे, नागोराव बनसिंगे या दोघांचा घटना स्थळीच मृत्यू झाला तर उमेश चौधरी गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक साखरकर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमीला रुग्णालयात भरती केले. याप्रकरणी पोालिसांनी कार चालक दिलीप वाद्याडे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
































































