केडगावमध्ये दुचाकीच्या डिकीतून अडीच लाखाची रक्कम लांबविली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

रस्त्याच्या कडेला हॉटेलसमोर उभ्या असलेल्या मोपेड दुचाकीची डिकी उघडून अज्ञात चोराने डिकीतील 2 लाख 40 हजार रुपयांची रक्कम चोरली. ही घटना केडगाव येथील गुरुदत्त हॉटेल व अंबिका हॉटेलसमोरुन सकाळी 9.30 ते 10.00 वाजण्याच्या सुमारास घडली. अंकुश बबन गायके (वय 35, रा.शास्त्रीनगर, केडगाव) हे किराणा दुकान व पतसंस्थेचे वसुलीचे काम करतात. गोळा झालेले 2 लाख 40 हजार रुपये त्यांनी त्यांच्या मोपेड दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवले होते. त्यांनी त्यांची मोपेड हॉटेलसमोर उभी करुन कामानिमित्त हॉटेलमध्ये गेले असता अज्ञात चोराने मोपेडची डिकी उघडून त्यातील रक्कम चोरली. याप्रकरणी कोतवाली पोसिलांनी गायके यांच्या फिर्यादीवरुन चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन करीत आहेत.