
सामना प्रतिनिधी । अमरावती
तिरुपती बालाजीला दर्शनाला जात असताना नवजीवन एक्सप्रेस मधून पडून अकोल्यातील उमरी भागातील दोन तरुणांचा मृत्यू झाला. हिंगणघाट जवळ हा अपघात झाला. सागर बगाडे आणि सागर नाटेकर अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत दोघे रेल्वे डब्याच्या गेटवर बसून प्रवास करत होते. वर्धा ते हिंगणघाटदरम्यान आष्टा (भुगाव) शिवारात रात्रीच्या दरम्यान तोल जाऊन दोघेही खाली घडली. ते दोघे पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर मित्रांनी हिंगणघाट रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. ट्रॅकवर शोधाशोध केली असता दोघांचा मृतदेह आष्टा शिवारात आढळून आले. सेवाग्राम पोलिसात याची अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली.




























































