‘भटाची मस्ती जिरवायची’ गाण्यावर आक्षेप, गायकांवर कडक कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

यूट्यूब, फेसबूक सारख्या सोशल मीडियाचा गैर वापर करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. यूट्यूबवर ब्राह्मण समाजाची बदनामी करणारे ‘भटाची मस्ती जिरवायची’ हे वादग्रस्त गाणे अपलोड करण्यात आले आहे. या विरोधात पुरोहित संघटनेने आवाज उठवला असून समाजात तेढ पसरवणारे गाणे काढून टाकण्याची तसेच अशी गाणी गाणाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

आपला देश हा सर्व धर्म-जातींना सोबत घेऊन चालणारा देश आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व धर्म-जातीचे सहकार्य आवश्यक असते. परंतु काही समाजकंटक समाजांमध्ये तेढ निर्माण करून वातावरण गढूळ करू पाहतात. तसाच प्रकार या गाण्यासंदर्भात असून याविरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी गणी करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून मुंबई येथील गायक सचिन मस्के व राजरत्न सावंत यांनी ‘भटाची मस्ती जिरवायची’ हे आक्षेपार्ह गाणे गावून याचे सोशल मिडीया व यूट्यूब वर व्हायरल केले आहे. सदरील गायकाने या गाण्यात ब्राह्मण समाजाची मने दुखवतील असे आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून ब्राह्मण समाजाच्या धर्मग्रंथ, पोथ्या पाण्यात बुडवाव्या असे गाण्यात म्हटले आहे. या शिवाय अनेक आक्षेपार्ह विधाने या गाण्यामध्ये आली असल्याने समाजाच्या भावना या गाण्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे ब्राह्मण समाज संतापला असून याविरोधात कारवाईची मागणी करत आहे, असे निवेदन पुरोहित संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

purohit-sangathana

यावेळी पुरोहित संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुक्मीकांत वझुरकर, तसेच मंदार कुलकर्णी, सतीष कोटेकर, व्यंकटेश मुगळीकर,दीपक बह्मपुरीकर, अभिजीत लिंबेकर, पद्माकर चिमनगांवकर, गौरव धानोरकर, अविनाश जोशी, गोविंद कुलकर्णी, मधुसुदन जोशी, सतिश कोटेकर, विश्वांभर जोशी, अवधूत कुलकर्णी, योगेश गौतम, अतुल सुपेकर, गजानन जोशी, संतोष पत्की आदीनाथ जोशी हे देखील उपस्थित होते.