
जगातील आघाडीची टेक कंपनी गुगलने आपल्या Google Play Store मधून दोन स्मार्ट टीव्ही आधारित अॅप्सवर बंदी घातली आहे. Smart TV remote आणि Halloween Coloring अशी बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सची नावे आहेत. गुगलला जेव्हाही आपल्या प्ले स्टोरवर अशा प्रकारचे मालवेअर असलेले अॅप आढळतात किंवा या संदर्भात एखाद्या सुरक्षा कंपन्यांनी त्यांना सूचित केल्यास यावर तात्काळ अॅक्शन घेऊन अशा अॅप्सवर बंदी घालण्यात येते.
गुगलने नव्याने बंदी घातलेल्या या अॅपपैकी एक Smart TV Remote ला एक हजाराहून अधिक युजर्सने डाउनलोड केले होते. या अॅपची माहिती Kaspersky च्या सुरक्षा विश्लेषक ‘तात्याना शिश्कोवा’ यांनी गुगलला दिली होती. त्यांनी ट्विटरद्वारे गुगलला या दोन अॅप संदर्भात माहिती दिली होती. शिश्कोवा ट्विट करत लिहिले आहे की, या दोन्ही अॅपमध्ये Trojanised Joker हा मालवेअर आहे. Joker मालवेअर युजर्सच्या न कळत विना परवानगी प्रीमियर सर्व्हिस ऍक्टिव्ह करण्यासाठी ओळखला जात.
ब्लीपिंग कॉम्प्युटरने या मालवेअर अॅप्सच्या कोडचे विश्लेषण केले आहे. Smart TV Remote आणि Halloween Coloring च्या आत असे दिसून आले की Smart TV Remote अॅपमध्ये resources/assets/kup3x4nowz अशी एक फाईल उपलब्ध आहे. यासोबतच Halloween Coloring अॅपमध्ये q7y4prmugi नावाची एक फाईल आहे. या फाइल्सचे मालवेअर कोड एनक्रिप्टेड असल्याने ते सहजा कोणत्याही अँटीव्हायरस अॅप्सद्वारे पकडले जात नाहीत. या अॅप्समध्ये असलेल्या मालवेअरची माहिती मिळाल्यानंतर गुगलने हे दोन्ही अॅप आपल्या प्ले स्टोवरून हटवले आहेत.
जर तुम्हीही Smart TV Remote किंवा Halloween Coloring हे अॅप इंस्टॉल केले असतील, तर ते लगेच डिलीट करा. तसेच हे अॅप डिलीट करण्यापूर्वी तुमच्या न कळत या अॅपची मेंबरशिप सर्व्हिस सुरु झाली आहे का, हेही तपासून घ्या. याशिवाय तुमच्या फोनमध्ये तुम्ही डाउनलोड न केलेले अॅप तुम्हाला आढळल्यास, ते ताबडतोब डिलीट करा. अशा प्रकारच्या अॅप्समध्ये मालवेअर असू शकतो. तसेच तुमच्या स्मार्टफोनवरील असे अॅप्स तपासा ज्यांच्यावर अॅप स्टोअरवर अत्यंत वाईट रिव्हिव्ह देण्यात आले असतील. असे अॅप आढळल्यास ते त्वरित डिलीट करून त्या ऐवजी इतर चांगला पर्याय शोधा.



























































