जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशवाद्यांचा खात्मा

जम्मू कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. त्यात दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बडगाम जिल्ह्यातील चंदुरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. तेव्हा सुरक्षा दलाने शोधमोहीम हाती घेतली. तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरूवात केली. तेव्हा प्रत्युत्तरादाखल सुरक्षादलानेही गोळीबार केला आणि चकमक उडाली.

तब्बल चार तास ही चकमक सुरू होती. तेव्हा दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.

हे दहशतवादी कुठल्या संघटनेचे होते याचा तपास सध्या सुरू असल्याचे सुरक्षा दलाने सांगितले. यापैकी एक दहशतवादी दुसर्‍याचा देशाचा असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या