मखमलाबादला चार दुचाकी जाळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या मखमलाबाद भागातील सिद्धिविनायक अपार्टमेंट येथे रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी चार दुचाकी जाळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मखमलाबाद येथे रॉयल टाऊनजवळ सिद्धिविनायक अपार्टमेंट आहे. येथील रहिवासी विजय रवींद्र भामरे यांची पॅशन प्रो दुचाकी व त्यांच्या अपार्टमेंटमधील इतर रहिवास्यांच्या एम-८०, प्लेझर व प्लॅटिना या दुचाकी पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या होत्या. अज्ञातांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्या पेटवून दिल्या. पूर्णतः जळाल्याने या चार दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भामरे यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.