दुचाकी व काळीपिवळी अपघातात दोन तरूण जागीच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
accident-common-image

सामना प्रतिनिधी । तुळजापुर

तुळजापुर तालुक्यातील तीर्थ बु. नजिक भरदाव वेगाने दोन वाहनात झालेल्या धडकेमध्ये धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) येथील दोन तरूण जागीच ठार झाले आहेत.

धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) येथील मन्सुर मानसुद सय्यद (१९) व शफिर शाराज शेख (२०) हे तरुण तुळजापूहून (एम.एच.के.जी.४.४००६) या दुचाकीवरुन नळदुर्गकडे निघाले होते. त्यांची दुचाकी तुळजापूर – नळदुर्ग मार्गावरील तीर्थ (बु.) येथे आली असता समोरुन येणाऱ्या काळीपिवळी (एम.एच.२५.बी.५४८) जीपमध्ये समोरासमोर जोरदार धडक बसुन दुचाकीवरील दोन्ही तरूण जागीच ठार झाले.

या अपघातात धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) येथील दोन तरुणाचा मृत्यू झाल्याने उपळा गावावर शोककळा पसरली आहे.