
छत्रपती शिवाजी महाराजांसह राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा करण्यात यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा काही विकृत प्रवृत्तींकडून वारंवार अवमान केला जात आहे. अशा विकृतींना नेस्तनाबूत करून आपल्या महान राजाचा स्वाभिमान आणि सन्मान जतन करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचा कोणी अवमान करीत असेल, तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा आणावा, असे उदयनराजेंनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास जगासमोर येण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि पेंद्र शासनाने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडला पाहिजे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.



























































