
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक शिर्डीत श्री साईदर्शनाला हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते साईबाबांची ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही आरती झाली. उद्धव ठाकरे यांनी साईसमाधीवर भगव्या रंगाची शाल अर्पण केली. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर साईबाबांची शाल व साईमूर्ती देऊन साई संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, संपर्कप्रमुख बबनराव घोलप, माजी विश्वस्त सचिन कोते, अविनाश दंडवते, संजय शिंदे, सुनील परदेशी, स्वाती परदेशी, रवि शिंदे, मुकुंद सिनगर, सुहास वहाडणे, गणेश सोमवंशी, नाना बावके, भागवत लांडगे, राजेंद्र पठारे आदी उपस्थित होते.


























































