
नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती, मात्र आपले मनोबल खचू न देता चिकाटीने सेवा देत राहा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील अधिकारी व कर्मचाऱयांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना सांगितले. विभागातील सर्व रूग्णालयांचे अग्निप्रतिबंधक, बांधकाम, विद्युत ऑडिट त्वरित करून पुढे अशी कुठलीही दुर्घटना घडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
दूरदृश्य प्रणालीद्वारे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. हुसेन रूग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱयांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पावसाळा, वादळ यादृष्टीनेही उपाययोजना कराव्यात. महापालिकेचे कोरोना नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड, रुग्णालयाचे डॉ. नितीन रावते, डॉ. अनिता हिरे, डॉ. किरण शिंदे, विशाल बेडसे, मेट्रन संध्या सावंत व कर्मचाऱयांशी संवाद साधून मनोबल उंचावण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रुग्णालयातील कामकाजाविषयी माहिती दिली.
यावेळी मुख्य सचिव सीताराम पुंटे, प्रधान सचिव आशिष सिंग, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास तसेच रुग्णालयातून जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिकेचे आयुक्त पैलास जाधव, अधिक्षक अभियंता एस. एम. चव्हाण उपस्थित होते.




























































