
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बारसू येथे शनिवारी, 6 मे 2023 रोजी भेट देणार आहेत. त्यांच्या नियोजित कार्यक्रमाची माहिती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आणि शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे सकाळी 10 वाजता साखर (कोंबे) येथील हॅलिपॅड येथे आगमन होईल. साखर (कोंबे) येथून डोंगर तिठा मार्गे कणेरी- मुख्य रस्ता (हायवे ) राजापूर जकात – नाका ते पेट्रोल पंप (सरस्वती हॉटेल च्या बाजूने) रानतळे मार्गे ते बारसू येथे पोहोचतील.
सकाळी 10:50 ते 11:05 – बारसू कातळशिल्प पाहणी करतील. यानंतर ते सकाळी 11:05 ते 11:25 दरम्यान गिरीमादेवी कोंड येथे पोहोचतील. सकाळी 11:25 ते 12:30 या दरम्यान ते गिरीमादेवी येथे प्रकल्प ग्रामस्थांशी संवाद साधतील. दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद होईल, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.


























































