उद्धव ठाकरे यांची 5 वाजता पत्रकार परिषद; संजय राऊत यांचं ट्विट, काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद होणार असल्याचं वृत्त आहे. ‘मातोश्री’ येथे होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे.

संजय राऊत यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की, मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज 5 वाजता अत्यंत ज्वलंत विषयावर पत्रकार परिषद.’ राऊत यांच्या ट्विटमुळे या पत्रकार परिषदेची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे.


कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान, राज्यपालांनी छत्रपती शिवरायांसंदर्भात केलेलं विधान, मुख्यमंत्र्यांनी हात दाखवून भविष्य बघितल्याचं वृत्त अशा विविध गोष्टींवर सध्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आज कुणाचा समाचार घेणार अशी उत्सुकता साऱ्यांना लागली आहे.