
छत्तीसगडमध्ये दोन सख्ख्या बहीणींनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी दोघींनी एक चिठ्ठी लिहली असून त्यात मामाने आपल्यावर बलात्कार केल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
शनिवारी रात्री 7.30 च्या सुमारास दोन बहीणी अचानक घरातू गायब झाले. एकीचे वय 21 तर दुसरीचे वय 23 वर्ष होते. खूप रात्र झाली तरी दोघी घरी न आल्याने पालक घाबरले आणि त्यांनी दोघींचा शोध घेण्यास सुरूवात केली. नंतर घराच्या अर्धा किमी दूर एका झाडाला लटकलेले दोघींचे मृतदेह आढळले. त्यांच्याकडे एक चिठ्ठी सापडली. मामाने आपल्यावर बलात्कार केल्याने आपण हे पाऊल उचलल्याचे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. व पुढील तपास सुरू आहे.





























































