
हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या सुरक्षेला सुरुंग लावत काही तरुण सभागृहात पोहोचले. यामुळे प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेवरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरले असून आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही यावर पहिली प्रतिक्रियी दिली आहे. यावेळी त्यांनी संसदेत झालेल्या घुसखोरीमागील कारणही स्पष्ट केले.
संसदेची सुरक्षा भंग झाल्याच्या घटनेवर माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेचा भंग झालाय हे खरे आहे, पण ते का झाले? देशातील सर्वात मोठा मुद्दा बेरोजगारीचा असून तो देशभरात पहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे देशातील तरुणांना काम मिळत नाहीये. सुरक्षेचा भंग झाले हे खरे असले तरी त्यामागे बेरोजगारी आणि महागाई हे कारण आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
संसद सुरक्षा में हुई चूक के पीछे सबसे बड़ा कारण बेरोजगारी और महंगाई है।
PM मोदी की नीतियों के कारण युवाओं को रोजगार नहीं मिल रहा है।
: @RahulGandhi जी pic.twitter.com/KQZbcY1Uvo
— Congress (@INCIndia) December 16, 2023
संसदेत काय घडलं?
– लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरळीतपणे पार पडला. त्यानंतर झीरो अवर सुरू झाला. त्यात भाजपचे पश्चिम बंगालमधील खासदार बवेश मुर्मू हे प्रश्न उपस्थित करत असतानाच सभागृहात मोठा आवाज झाला.
-खासदारांनी मागे वळून पाहिले तर दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारल्याने सगळेच हादरले. हे तरुण थेट खासदारांच्या बाकांवर चढून घोषणा देऊ लागले. एका तरुणाने शूजमधून स्मोकबॉम्ब काढून तो पह्डला.
– सभागृहात पिवळय़ा आणि हिरव्या रंगाच्या धुराचे लोळ उठल्याने घबराट पसरली. खासदारांची पळापळ झाली. प्रचंड गोंधळ निर्माण झाला. बेफामपणे उडय़ा मारत एक आंदोलक सभापतींच्या आसनाच्या दिशेने जात होता. त्याला काही खासदारांनी घेरून पकडले.
– दोन्ही तरुणांना खासदारांनी पकडले. यावेळी एका तरुणाला चांगलाच चोप देण्यात आला. सभागृहात हल्ला झाला त्याचवेळी बाहेर त्यांच्या साथीदारांनी घोषणाबाजी करत स्मोकबॉम्ब फोडले.
– खासदार मुकुल नागर यांनी या तरुणांना अडविण्याचे धाडस दाखविले. काँग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी, सुनील मेंढे व इतर खासदारांनी त्यानंतर या तरुणांना पकडून सुरक्षा रक्षकांच्या हवाली केले.
– धुरामुळे डोळय़ांना त्रास होत होता. स्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पीठासीन अधिकारी राजेंद्र अगरवाल यांनी कामकाज तहकूब केले.
8 कर्मचारी निलंबित
संसद भवनाच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई केली आहे. लोकसभा सचिवालया सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संबंधित 8 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. रामपाल, अरविंद, वीरदास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित, नरेंद्र अशी या कर्मचाऱ्यांची नावे असल्याची माहिती मिळत आहे.
























































