
1960-70 च्या दशकापासून अगदी 2010 पर्यंत चार दशके सिनेसृष्टी गाजविणारे, मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, ओरिया, पंजाबी, भोजपुरी, राजस्थानी, नेपाळी अशा अनेक भाषांत सुमारे 450 चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन केलेले प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांच्या अविस्मरणीय आठवणी जागविणारा टॉक शो ‘आठवणीतले सुबलदा’ येत्या 15 फेब्रुवारीपासून यूटय़ूब चॅनेलवर सुरू होत आहे.
टॉक शोची सुरुवात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या मुलाखतीने होणार आहे. समर्थन प्रॉडक्शन प्रस्तुत ‘आठवणीतले सुबलदा’ या टॉक शो ची संकल्पना व प्रस्तुती डॉ. किशु पाल यांची आहे. यासाठी चित्रपट दिग्दर्शक सतीश रणदिवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
- ‘आठवणीतले सुबलदा’ या टॉक शोमध्ये सुबल सरकार यांच्यासोबत काम केलेले पडद्यावरील चित्रपट कलाकार, निर्माते, दिग्दर्शक तसेच पडद्यामागील चित्रपट तंत्रज्ञ, पॅमेरामन, संकलक, संगीत दिग्दर्शक, गीतकार, सहाय्यक यांच्या मुलाखतीतून त्यांच्या आठवणी व कार्याचा आढावा घेतला जाईल.