
देशातील कोरोनाची परिस्थिती बिकट होत आहे. दररोज दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने रुग्णालयं खचाखच भरली असून बेडची कमतरता जाणवत आहे. सामान्य नागरिकांसह व्हीआयपी लोकांनाही आता रुग्णालयात बेड मिळेनासे झाले आहेत. याचमुळे दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्र्यांना मदतीसाठी ट्विटरवर याचना करावी लागत आहे.
केंद्रीय मंत्री जनरल व्ही.के. सिंह यांनी केलेल्या एका ट्विटमुळे देशातील कोरोना स्थिती किती गंभीर आहे याची जाणीव होतेय. जनरल व्ही.के. सिंह यांच्या भावाला कोरोनाची लागण झाली असून रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांना बेडही मिळत नाहीय. आपल्या भावाला बेड मिळावा यासाठी जनरल व्ही.के. सिंह यांनी ट्वीट केले आहे. यात त्यांनी गाझियाबादचे डीएम, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार शलभ मणि त्रिपाठी आणि नोएडाचे आमदार पंकज सिंह यांना टॅग केले आहे.
‘कृपया आमची मदत करा. माझ्या भावाला कोरोना झाला असून त्याच्यावर उपचार करण्यासाठी बेडची आवश्यकता आहे. सध्या गाझियाबादमध्ये बेडची व्यवस्था होऊ शकत नाहीय’, असे ट्वीट जनरल व्ही.के. सिंह यांनी केले आहे.
@dm_ghaziabad
Please check this out
प्लीज़ हमारी हेल्प करे मेरे भाई को कोरोना ईलाज के लिए बेड की आवश्यकता है।अभी गाजियाबाद में बेड की व्यवस्था नहीं हो पा रही है। @shalabhmani @PankajSinghBJP @Gen_VKSingh— Vijay Kumar Singh (@Gen_VKSingh) April 18, 2021
दरम्यान, या ट्विटला शलभ मणि त्रिपाठी यांनी उत्तर दिले आहे. गाझियाबादचे जिल्हाधिकारी तुमच्याशी तात्काळ संपर्क साधतील असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
जिलाधिकारी गाजियाबाद आपसे तत्काल वार्ता कर रहे हैं।
— Shalabh Mani Tripathi (@shalabhmani) April 18, 2021



























































