उन्नाव बलात्कार प्रकरण – कुलदीपसिंह सेंगरबाबत 16 डिसेंबरला फैसला

678

उन्नाव बलात्कार प्रकरणी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणी न्यायालय 16 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणी आमदार कुलदीपसिंह सेंगर आणि शशी सिंहबाबत न्यायालय निकाल देणार आहे. या प्रकरणात कुलदीपसिंह विरोधात आरोप सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते. शशी सिंहने पीडितेला सेंगर यांच्याकडे नेले होते. तिथे सेंगरने पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाशी संबंधित इतर चार प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. याबाबतचे दुसरे प्रकरण पीडितेवर सामुहिक बलात्कार झाल्याचा एफआयआर दाखल झाल्याचे आहे. तर तिसरे प्रकरण पीडितेच्या वडिलांना झालेली मारहाण आणि पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यू झाल्याबाबतचे आहे. त्यानंतर पीडितेच्या वाहनाच्या अपघाताबाबतचे प्रकरण आहे. या अपघातात पीडितेच्या नातेवाईक महिलांचा मृत्यू झाला होता. तर पीडिता जखमी झाली होती. या प्रकरणांबाबतची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. मात्र, सेंगर आणि सिंह यांच्याबाबतचा निकाल 16 डिसेंबरला येण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या