साक्षी महाराज भाजपवर कोपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। उन्नाव

लोकसभा निवडणुकीचे ऐलान होताच तिकीटासाठी रेटारेटी सुरू झाली आहे. उन्नाव येथील भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी तर उमेदवारीसाठी थेट आपल्याच पक्षाला धमकी दिली आहे. उन्नाव मतदारसंघातून उमेदवारी न दिल्यास परिणाम वाईट होतील असा इशारा त्यांनी प्रदेशाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.

साक्षी महाराज उन्नाव येथून लोकसभेवर निवडून गेले आहेत. यावेळी साक्षी महाराज यांचा मतदारसंघ बदलण्यात येणार असल्याची चर्चा जोरावर आहे. त्यामुळे संतापलेल्या साक्षी महाराज यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. महेंद्रनाथ पांडेय यांना पत्र लिहून चांगलेच खडसावले आहे. 2014 च्या निवडणूकीत उन्नाव येथून आपण सव्वातीन लाखांचे मताधिक्य घेऊन विजयी झालो होतो. पाच वर्षात रक्ताचे पाणी करून, कोटय़वधी रुपये खर्चुन आपण मतदारसंघाची बांधणी केली आहे. खस्ता खाऊन जिल्हय़ात पक्ष उभा केला आहे. यावेळी पक्षाने मला संधी दिल्यास किमान चार लाख मतांनी विजयी होईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र आपल्याला उमेदवारी न दिल्यास त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागतील असा इशाराही साक्षी महाराज यांनी पत्रात दिला आहे.