मुसलमानही घर देत नाही आणि हिंदुही घर देत नाही… उर्फी जावेदची ‘घरघऱ’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रविचित्र बोल्ड कपड्यांमुळे कायम वादात अडकणारी अभिनेत्री उर्फी जावेद ही सध्या अडचणीत सापडली आहे. उर्फी सध्या स्वत:साठी मुंबईत भाड्याने घर शोधत आहे. मात्र तिला कुणीच भाड्याने घर देत नसल्याची खंत तिने सोशल मीडियावरील पोस्टमधून व्यक्त केली आहे.

उर्फी जावेदने ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणते ”मुस्लीम घरमालक मला घर भाड्याने देऊ इच्छित नाही कारण त्यांना माझे कपडे आवडत नाही. हिंदू मला घर देत नाहीत कारण मी मुस्लीम आहे. काही घरमालाकांना मला राजकारण्यांकडून मिळणाऱ्या धमक्यांची भीती वाटते. मुंबईत भाड्याने घर शोधनं माझ्यासाठी खूपच कठिण झालं आहे’, असे उर्फीने ट्विट केले आहे.

काही दिवसांपासून उर्फी जावेद व भाजच्या महिला मोर्चाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू आहे. उर्फीच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर उर्फी जावेद हिने तिला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून मला सुरक्षा पुरवावी अशी मागमी महिला आयोगाकडे केली होती.