
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यावर्षी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. अखिलेश करहाल मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान या मतदारसंघातून त्यांच्याविरोधात घरातीलच व्यक्ती निवडणूक लढवणार असल्याचे समजते.
भाजपने करहाल मतदारसंघातून अखिलेश यांच्या धाकट्या भावाची पत्नी अपर्णा यादव यांना तिकीट देण्याचा विचार केला आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान अपर्णा यांच्या जवळच्या व्यक्तीने त्या त्यांच्या दिराविरोधात निवडणूक लढायला तयार होणार नाही असे सांगितले आहे.टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. ‘भाजप जे सांगेल ते अपर्णा यादव करतील पण आपल्या कुटुंबातील व्यक्तीविरोधातच निवडणूक लढवण्याचा त्या विचार करू शकत नाही. भाजपला देखील हे माहित आहे’, असे सूत्रांनी सांगितले.
मैनपूरी जिल्ह्यातील करहाल मतदारसंघातून अखिलेश यादव सोमवारी निवडणूक अर्ज भरणार आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसने ग्यायनवती देवी यादव यांना तर बसपाने कुलदीप नारायण यांना तिकीट दिलेले आहे.



























































