फ्रेश जोडीचा ‘फ्लिकर’ 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनोख्या शीर्षकांच्या चित्रपटांसाठी मराठीसृष्टी ओळखली जाते. असंच हटके टायटल आणि प्रेमाचा हळूवार अनुबंध उलगडून दाखविणारा ‘फ्लिकर’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातून प्रेमाचा खरा अर्थ दाखवतानाच नात्याचा परामर्श घेतला जाणार आहे. नुसरत शानुर मुजावर, मणीगंडन मंजुनाथन, प्रेमराणी मंजुनाथन यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली असून सहनिर्मिती राहुल पाटील यांची आहे.

अमोल पाडावे यांनी या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. ‘फ्लिकर’ च्या माध्यमातून राजवीर सरकार आणि तन्वी किशोर ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोघांसोबत सयाजी शिंदे, संजय मोने, समीर चौघुले, शुभांगी लाटकर, पूजा पवार, अरुण कदम, गौरव रोकडे, मनिषा केळकर, मौसमी तोंडवळकर, पूर्णिमा अहिरे, सायली जाधव आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मंगेश कांगणे यांनी गाणी लिहिली आहेत.